'अल कायदा' मॉड्यूलचा पर्दाफाश !

29 Jul 2025 14:30:00
 
sanskrutik vartapatra dahashatvad_23.jpg
 
गुजरात एटीएसने 'अल कायदा'च्या एका मॉड्यूलचा पर्दाफाश केला असून मोठा दहशतवादी कट उधळून लावला आहे. यात चार दहशतवाद्यांना अटक केली असून मोहम्मद फरदीन रईस, सैफुल्ला कुरेशी रफिक, मोहम्मद फैक रिझवान आणि जीशान अली अशी त्यांची नावे आहेत. कटात सामील असलेल्या इतर आरोपींचाही शोध सुरू आहे. दिल्ली, नोएडा येथून प्रत्येकी एक दहशतवादी आणि गुजरातमधून दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे.
 
गुजरात एटीएस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे चौघेही बऱ्याच काळापासून 'अल कायदा' मॉड्यूलशी संबंधित होते. ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे एकमेकांच्या संपर्कात आले. तपासादरम्यान एटीएसला आढळून आले की, हे लोक गुजरातमधील कारवायांबद्दल सतत चर्चा करत होते. दहशतवादी विचारसरणीशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत होते. या प्रकरणाचा सध्या सायबर सेलद्वारे तपास सुरू आहे. गुजरात एटीएसला असेही आढळून आले आहे की, दहशतवादी ऑटो-डिलिटिंग अॅप्लिकेशनदेखील वापरत होते. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सीमेपलीकडे बसलेल्या दहशतवादी हॅण्डलर्सच्या संपर्कात होते. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. यापूर्वी २०२३ मध्ये सुरक्षा यंत्रणांनी गुजरातमध्ये 'अल कायदा' या दहशतवादी संघटनेचे नेटवर्क स्थापन केल्याचा खुलासा केला होता. एटीएसने तेव्हाही दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. यात चार बांगलादेशींना अटक करण्यात आली होती.

मुंबई तरुण भारत २५/७/२५
Powered By Sangraha 9.0