'लाल सलाम' नव्हे प्रांतवादाचे विष

21 Jul 2025 14:30:00
 
sanskrutik vartapatra naxalvad 15.jpg
 
हिंसा हे मुख्य धोरण असलेल्या नक्षलवादामध्ये प्रांतवाद आणि वर्चस्ववाद ठासून भरलेला आहे. समानता, वर्गसंघर्ष आणि अन्यायाविरोधात लढ्याच्या गोंडस घोषणा करणारे हे नक्षलवादी प्रत्यक्षात आम्हीच श्रेष्ठ या मानसिकतेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. नक्षलवादी आणि त्यांचे शहरी समर्थक सामाजिक एकात्मतेचा लढा लढत असल्याचे स्वप्न दाखवत असतात. मात्र, या हिंसक टोळीचे नेतृत्व करणारे प्रांतवादाच्या विषाने भरलेले असल्याचे सिद्ध होते. २००५ साली जेव्हा देशभर पसरलेले कट्टरपंथी डाव्या गट एकत्र आले तेव्हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) अस्तित्वात आला.

भारतात बंदी असलेल्या माओवादी बंडखोर गटातील सीपीआय (माओवादी) 'पॉलिटब्युरो' ही एक उच्चस्तरीय निर्णय घेणारी संस्था आहे. केल्यास त्यामध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणतील नक्षली नेत्यांचाच भरणा असल्याचे दिसते.

'दक्षिण आशिया टेररिझम पोर्टल'च्या माहितीनुसार, २००४ साली 'पॉलिटब्युरो' मध्ये १६ सदस्य होते. परंतु, बसवराजूच्या मृत्यूनंतर हे संख्याबळ फक्त तीनपर्यंत घटले. यामध्ये मुपल्ला लक्ष्मण राव उर्फ गणपती आणि मल्लजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू हे दोघे आंध्र-तेलंगणचे आहेत. केवळ मिसीर बेसरा झारखंडचा आहे. केंद्रीय समितीतही सदस्य कार्यरत आहेत. त्यातील बहुतेकजण अद्याप लपून आहेत किंवा इतके वृद्ध आहेत की प्रभावी काम करू शकत नाहीत.

मुंबई तरुण भारत १३/७/२५
Powered By Sangraha 9.0