नैसर्गिक उपक्रमांना चालना देणाऱ्या गृहप्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने नुकताच 'ग्रीन सोसायटी' हा उपक्रम सुरू केला आहे. स्थानिक पातळीवर उपाययोजना राबवून नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे," असे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
स्थानिक पातळीवर पर्यावरण पूरक उपाययोजना राबवून नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश असून हे पाऊल पर्यावरणस्नेही परिसर आणि जबाबदार नागरी जीवनशैली निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून या उपक्रमाकडे बघितले जाणार आहे.
या उपक्रमात ओला-सुका कचरा वर्गीकरण, कंपोस्ट प्रकल्प, सौरऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सांडपाण्याचे शुद्धीकरण व पुनर्वापर यंत्रणा बसविणे यांचा समावेश होतो. प्रत्येक निकष पूर्ण केल्यावर सोसायटीला एक हरित तारांकित मानांकन (स्टार रेटिंग) दिले जाणार आहे. सर्व निकष पूर्ण करणाऱ्या सोसायट्यांचा महापालिकेच्यावतीने सन्मान करण्यात येणार आहे. महापालिका शहरातील वातावरण पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सोसायट्यांचा पालिका गौरव करणार आहे आणि यामुळे इतर सोसायट्यांना प्रेरणा मिळणार आहे. तसेच महापालिकेकडून हा उपक्रम टप्याटप्याने राबवण्यात येणार आहे. सर्व प्रथम जनजागृती सत्रे घेण्यात येणार आहेत. त्यानंतर नोंदणी झालेल्या गृहप्रकल्पांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
कशी असायला हवी 'ग्रीन सोसायटी ?
•कचरा वर्गीकरणः ओला आणि सुका कचरा स्रोताजवळच वेगळा करणे.
•घरगुती कंपोस्टिंगः सेंद्रिय कचऱ्याचे सोसायटीमध्येच व्यवस्थापन करणे,
•सौरऊर्जा वापरः सार्वजनिक भागांतील वीजगरजांसाठी सौर पॅनेलचा वापर करणे.
•पावसाचे पाणी साठवण (रेनवॉटर हार्वेस्टिंग):
पावसाचे पाणी संकलित करून वापरणे
•सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापरः सांडपाण्यावर प्रक्रिया करून बागकाम व अन्य उपयोगांसाठी वापरणे.
मुंतभा १०/६/२५