भारताला सोमवारी एलसीए मार्क १ए लढाऊ विमान कार्यक्रमासाठी अमेरिकेकडून दुसरे जीई-४०४ इंजिन मिळाले आहे, अशी माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.
सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) हे इंजिन मिळाले आहे आणि या आर्थिक वर्षाच्या अखेरीस त्यांना आणखी १२ जीई-४०४ इंजिने मिळणार आहेत. ही इंजिने एलसीए मार्क १ए लढाऊ विमानांमध्ये बसवली जाणार आहेत. अमेरिकन इंजिन उत्पादक कंपनीला येणाऱ्या पुरवठा साखळीच्या समस्यांमुळे इंजिने मिळण्यास एक वर्षापेक्षा जास्त विलंब झाला आहे.
भारतीय हवाई दलाने ८३ एलसीए मार्क १ए लढाऊ विमानांसाठी मागणी नोंदवली असून संरक्षण मंत्रालयाच्या मंजुरीनंतर ९७ आणखी विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एलसीए मार्क २ प्रकल्प हा २०३५ च्या सुमारास जुन्या झालेल्या मिराज २०००, जग्वार आणि मिग-२९ विमानांच्या ताफ्याची जागा घेण्याची अपेक्षा आहे. पुढील १० वर्षांहून अधिक काळात भारतात अमेरिकन जीई इंजिन प्रकारांसह ४०० हून अधिक स्वदेशी एलसीए विमाने बांधली जाण्याची अपेक्षा आहे. एलसीए तेजसची अद्ययावत आणि अधिक घातक आवृत्ती असलेल्या एलसीए एमके २ च्या विकासासाठी ९००० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला आहे. विमान इंजिनसह स्वदेशीकरणाला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी, जून २०२३ मध्ये पंतप्रधानांच्या अमेरिका भेटीदरम्यान भारतात जीई इंजिनच्या निर्मितीसाठी तंत्रज्ञान हस्तांतरणाची वाटाघाटी जीईशी करण्यात आली होती. येत्या काळात, तेजस हा भारतीय हवाई दलाद्वारे चालवला जाणारा सर्वात मोठा लढाऊ विमानांचा ताफा असेल.
मुंबई तरुण भारत १५/७/२५