दीड महिन्यापूर्वी बांगलादेशात नेऊन सोडण्यात आलेला घुसखोर पुन्हा दिल्लीत परतला !

19 Jul 2025 14:30:00

sanskrutik vartapatra antargat suraksha_26.jpg
 
दिल्ली पोलिसांनी एका बांगलादेशी तृतीयपंथी घुसखोराला अटक करून त्याला पुन्हा बांगलादेशात पाठवले होते. तो ४५ दिवसांनी पुन्हा भारतात घुसखोरी करून दिल्लीत पोचल्याचे उघड झाले आहे. यापूर्वी तो अनेक वर्षांपासून दिल्लीत राहून भीक मागून जीवन जगत होता. परत आल्यानंतर तो पुन्हा पूर्वी ज्या शालीमार बागेत रहात होता, तेथेच राहू लागला. सुहान खान (वय ३० वर्षे) असे त्याचे नाव आहे.

दिल्ली पोलिसांनी मे महिन्यात ३०० हून अधिक बांगलादेशी घुसखोरांना अटक केली होती. त्यांना मे आणि जून या महिन्यांमध्ये त्रिपुरातील आगरतळा येथे विमानाने नेऊन बांगलादेशाच्या सीमेपलीकडे सोडण्यात आले होते.

सनातन प्रभात ३/७/२५
Powered By Sangraha 9.0