आयुर्वेदिक काढ्याचा पांडुरंगाला नैवैद्य
नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशीला प्रचंड संख्येने भक्त आणि वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेले होते. ही भाविकांची गर्दी लक्षात घेता विठ्ठलाचा पलंग काढून भाविकांना चोवीस तसं दर्शन उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे देवाला आलेला शिणवटा तथा थकवा घालवण्यासाठी विठ्ठलाला एकादशीनंतर दोन दिवसांनी म्हणजे बुधवारी रात्री शेजारतीच्या वेळी आयुर्वेदिक काढ्याचा नैवैद्य दाखवण्यात आला. तसेच प्रक्षाळ पूजा करून देवाचे राजोपचार सुरू करण्यात आले.
तेव्हापासून विठ्ठलास आणि रुक्मिणी मातेस पहाटे होणारी काकड आरती, नित्यपूजा, महानैवेद्य, पोशाख, धुपारती आणि शेजारती इथपर्यंतचे सर्व राजोपचार परंपरेनुसार सुरू करण्यात आले.
लोकमत १७.७.२५