ओरिसातील पुरी येथे भगवान जगन्नाथाची रथयात्रा चालू असल्याच्या पार्श्वभूमीवर कॅनडामधील टोरंटो येथेदेखील अशीच रथयात्रा काढण्यात आली होती. या रथयात्रेत बाजूच्या इमारतीवरून काही अंडी त्यावर फेकण्यात आली.
यासंदर्भात भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी 'एक्स' वर पोस्ट करताना म्हटले आहे की," टोरंटोमधील रथयात्रेच्या दरम्यान काही खोडसाळ लोकांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. एकता,सर्वसमावेशकता आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश देणाऱ्या अशा उत्सवाच्या मूळ तत्वाविरोधात असे आक्षेपार्ह आणि अस्वीकारार्ह आहे. संबंधितांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी कॅनडा सरकारकडे केली.
सनातन प्रभात १६.७.२५.