मोहरमच्या मिरवणुकीत हिजबुल्लाह समर्थनार्थ नारेबाजी

14 Jul 2025 14:30:00
 
sanskrutik vartapatra islamic_31.jpg
 
मोहरमच्या निमित्ताने श्रीनगर येथे निघालेल्या मिरवणुकींमध्ये हिजबुल्लाह समर्थनार्थ नारेबाजी आणि इराणचे झेंडे फडकवल्याचे निदर्शनास आले. यावेळी उपस्थित हजारोंच्या जमावाने उघडपणे हिजबुल्लाह आणि इराणी झेंडे फडकावत इराणी सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी आणि मारल्या गेलेल्या इराणी कमांडर्सचे फोटो घेऊन मोर्चा काढला. पोलिसांनी याची दखल घेत जेव्हा मिरवणुकीतून हिजबुल्लाहचा ध्वज काढून टाकला तेव्हा जमाव नियंत्रणाबाहेर गेला आणि त्यांनी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला मारहाण केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहरमच्या आठव्या दिवशी शिया समुदायाने श्रीनगरमध्ये मिरवणूक काढली. पोलिसांनी मिरवणूक काढण्याची परवानगी देण्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे. मिरवणूक गुरु बाजार येथून सुरू झाली आणि जहांगीर चौक, मौलाना आझाद रोड मार्गे दालगेट येथे पोहोचली. मिरवणुकीदरम्यान पोलिसांना इराण आणि हिजबुल्लाहशी संबंधित झेंडे निदर्शनास आले, त्यामुळे त्यांनी सार्वजनिक ठिकाणांहून काढून टाकले. मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांनी इराणच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली.

मुंबई तरुण भारत ५/७/२५    
Powered By Sangraha 9.0