जलालपूर शहरात गेली ६२९ वर्षे आयोजित होणाऱ्या रथमेळ्याला तृणमूल काँग्रेसने अनुमती नाकारली. श्री महाप्रभू मंदिराजवळ हा मेळा आयोजित केला जातो, जो साधारण एक आठवडा चालतो. रथयात्रा हा त्याचाच एक भाग आहे. पोलिसांनी केवळ रथयात्रेसाठी अनुमती दिली; परंतु मेळ्याला ती दिली नाही. 'मेळ्यामुळे परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो', असे पोलिसांचे म्हणणे होते. गेल्या काही वर्षात रथयात्रेच्या काळात हत्येसारखे अनेक गंभीर गुन्हे घडले आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने तृणमूल काँग्रेस सरकारच्या सूचनेनुसार मेळा बंद करण्याचा निर्णय घेतला.
सनातन प्रभात २४/६/२५