बांगलादेशातील दुर्गामाता मंदिर पाडण्याची धमकी

01 Jul 2025 14:30:00
 
sanskrutik vartapatra islamic_32.jpg
 
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस अल्पसंख्याक हिंदूंचे रक्षण करण्याचे कितीही आश्वासन देत असले, तरी हिंदूंची मंदिरे आजही बांगलादेशात सुरक्षित नाहीत. १ हजार, ४०० वर्षे जुन्या शिवचंडी माता मंदिरावरील 'लॅण्ड जिहाद' चे प्रकरण ताजे असतानाच ढाका येथील श्री दुर्गा मंदिराला इस्लामिक कट्टरपंथींनी घेराव घालत मंदिर पाडण्याची हिंदूंना धमकीदेखील दिल्याचे निदर्शनास आले आहेत. "जर अल्पसंख्याक हिंदू समुदाय त्यांच्या आदेशापुढे झुकला नाही तर ते मंदिर पाडतील," असे कट्टरपंथींनी धमकावल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्री दुर्गा मंदिर हे ढाकातील भव्य मंदिरांपैकी एक असून ते सध्या इस्लामिक कट्टरपंथीच्या टार्गेटवर आहे. या मंदिरात मोठ्यासंख्येने भाविक येतात. मंदिराभोवती जेव्हा जमाव जमला, त्यावेळीसुद्धा भाविक मोठ्या संख्येने मंदिरात उपस्थित होते. तेव्हाच उपस्थित कट्टरपंथीपैकी एकाने धमकी दिली की, जर अल्पसंख्याक हिंदू समुदाय त्यांच्या आदेशापुढे झुकला नाही, तर ते मंदिर पाडतील.

मंदिराजवळ प्रचंड गर्दी पाहून पोलीस आणि त्यांनी परिस्थिती हाताळली. सध्या वरिष्ठ अधिकारी प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या माहितीनुसार इस्लामिक कट्टरपंथी जमावाने मंदिर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण केली. मंदिराजवळ झालेल्या भांडणाचा परिणाम म्हणून तो एक 'अल्टिमेटम' असल्याचे त्यांचे म्हणणे होते. 'यापूर्वी कोमिल्ला जिल्ह्यातील लालमाई हिल्स भागातील चांदीमुरा परिसरात असलेल्या १ हजार, ४०० वर्षे जुन्या शिवचंडी मंदिराच्या जमिनीवर अब्दुल अली नामक व्यक्तीने अतिक्रमण करून घर बांधून ती त्याची वडिलोपार्जित मालमत्ता असल्याचा दावा केला होता.

मुंबई तरुण भारत २७/६/२५
Powered By Sangraha 9.0