हिंदू साम्राज्य दिवस

09 Jun 2025 14:30:00
 
Sanskrutik Vartapatra_Hindu Sanskruti_28
 
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिनांक ६ जून १६७४ रोजी रायगडावर करण्यात आला. त्यामुळे हा दिवस 'हिंदू साम्राज्य दिवस' म्हणून साजरा केला जातो. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा दिवस 'हिंदू साम्राज्य दिन' म्हणून साजरा करतो. या दिवशी असणारी तिथी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही होती. यानुसार यावर्षी ९ जून रोजी साजरा केला जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक व्हावा अशी त्या काळातील साधू संतांची इच्छा होती तशीच त्यावेळच्या गोरगरीब जनतेचीदेखील होती. म्हणून महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेण्याचे मान्य केले.भारतात आजवर अनेक राजे होऊन गेले पण छत्रपती शिवाजीमहाराजांना जनतेने ईश्वराचा अंश मानले म्हणून त्यांचा शिवराज्याभिषेक हा 'हिंदू साम्राज्य दिन' म्हणून साजरा केला जातो.
Vsk देवगिरी आणि तरुण भारत

Powered By Sangraha 9.0