पंकज सुतार यांनी लावला प्लास्टिक खाणाऱ्या जिवाणूंचा शोध !

09 Jun 2025 17:30:00

Sanskrutik Vartapatra_Vidnyan_ 4 
सोलापूर : येथील पंकज सुतार यांनी प्लास्टिक खाणाऱ्या जिवाणूंचा शोध ४ वर्षे चिकाटीने आणि जिद्दीने प्रयोग करून लावला आहे. जागतिक स्तरावर हे संशोधन पोचले असून त्यासाठी पेटंट नोंदवण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.
प्लास्टिकच्या तुकड्यांवर वाढणारे सूक्ष्म जीव गोळा करून त्यांनी त्याचा अभ्यास केला. जनुकीय पडताळणीसह तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यांनी १० वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू शोधले असून ते विविध प्रकारच्या प्लास्टिकचे ६५ टक्के विघटन करू शकतात.

सनातन प्रभात ७.६.२५
Powered By Sangraha 9.0