जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (५ जून), केंद्रीय शिक्षणमंत्री प्रधान यांनी 'आई तुझ्या नावाने झाड २.०' या विशेष वृक्षारोपण कार्यक्रमात सर्वसामान्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. हा उपक्रम केवळ संख्येपुरता मर्यादित नसून, निसर्गाबद्दल प्रेम आणि जबाबदारीचे प्रतीक आहे. त्यांनी विशेषतः विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या नावाने झाड लावण्याचे आवाहन केले. जे त्यांच्या आईप्रती व मातृनिसर्गाप्रती कृतज्ञतेचे प्रतीक ठरेल. या उप्रकमात १० कोटी झाले लावली जाणार आहेत.
५.५ कोटी झाडे, २०२४ मध्ये हा उपक्रम सुरू झाल्यापासून लावण्यात आली आहेत. हा उपक्रम आता एका जनआंदोलनाचा भाग बनला आहे.
मोदी यांच्या 'मिशन लाइफ' ला बळकटी
प्रधान यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मिशन लाइफ' (लाइफस्टाइल फॉर एनव्हायर्नमेंट) संकल्पनेला बळकटी देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. या उपक्रमाअंतर्गत ५ जून ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत १० कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. २९ लाख हून अधिक विद्यार्थ्यांनी झाडांची डिजिटल नोंदणी केली.
लोकमत ५/६/२५