जहाल माओवादी सुधाकर ठार

07 Jun 2025 14:30:00

sanskrutik vartapatra naxalvad_11 
सुमारे तीन कोटी रुपयांहून अधिकचे बक्षीस असलेला माओवाद्यांचा केंद्रीय समिती सदस्य सिंहाचलम उर्फ सुधाकर उर्फ गौतमला बिजापूर जिल्ह्यातील इंद्रावती नॅशनल पार्कच्या जंगलात सुरक्षा दलाने कंठस्नान घातले. माओवादी विचारधारेचा प्रसार करणाऱ्या वैचारिक प्रशिक्षण समितीचा हा प्रमुख होता. तत्कालीन आंध्र प्रदेश सरकारसोबत २००४मध्ये झालेल्या शांतता चर्चेत जंगलाबाहेर येऊन सुधाकरने प्रमुख भूमिका बजावली होती. जहाल माओवादी बसवराजूनंतर अवघ्या १५ दिवसांत सुधाकर ठार झाल्याने माओवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे.
आंध्र प्रदेशच्या येलूर जिल्ह्यातील चिंतापालोडी येथील मूळ रहिवासी असलेला सुधाकर हा उस्मानिया विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर माओवादी विचारधारेकडे आकर्षित झाला. माओवादी विचारधारेचा प्रचार-प्रसार करून तरुणांना संघटनेकडे आकर्षित करणे, माओवादी विचारधारेची प्रसिद्धी सकारात्मक रीतीने पसरविण्यासाठी रणनीती करणे हे त्याचे काम होते.
महाराष्ट्र टाईम्स ६/६/२५
Powered By Sangraha 9.0