नाशिकमध्ये 'लव्ह जिहाद’चे दोन खळबळजनक प्रकार उघडकीस आले असून, सातपूर आणि अंबड पोलीस ठाण्यांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये पीडित महिला हिंदू असून आरोपी मुस्लिम युवक आहेत. या दोघांनी आपली खरी ओळख लपवून पीडित महिलांशी संबंध ठेवत लग्न आणि नोकरीच्या आमिषाने त्यांच्यावर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.
या दोन्ही घटनांबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी माहिती देताना सांगितले की, पीडित महिलांनी तक्रारी दिल्यानंतर तपास सुरू आहे. आरोपींची ओळख लपवून लिव्ह-इनमध्ये राहत महिलांवर दबाव टाकण्यात आला. दोन्ही प्रकरणात पीडित महिलांना अपत्य असून, आरोपींकडून त्यांच्यावर धर्मांतरासाठी सतत दबाव टाकण्यात आला होता.
एबीपी माझा ५.६.२५.