पुढील ४० वर्षांत ब्रिटनमध्ये ब्रिटीश होणार अल्पसंख्यांक!

05 Jun 2025 14:30:00

 
sanskrutik vartapatra islamic_24

बकिंगहॅम विश्‍वविद्यालयाच्या अहवालामध्ये ब्रिटनमध्ये येत्या ४० वर्षांत ब्रिटीश अल्पसंख्यांक होतील, असे सांगण्यात आले आहे. स्थलांतरितांच्या वाढत्या संख्येचे, जन्म-मृत्यूच्या प्रमाणाचे मूल्यांकन करतांना या अहवालात असे म्हटले आहे की, ब्रिटीश मूळ असलेल्या लोकांची संख्या ७३ टक्के आहे, जी वर्ष २०५० पर्यंत ५७ टक्के असेल; परंतु वर्ष २०६३ पर्यंत ब्रिटीश मूळ असणारे लोक अल्पसंख्यांक होतील आणि अश्‍वेत लोकसंख्येचे प्रमाण ५० टक्क्यांच्या पुढे जाईल. लंडन आणि बकिंगहॅम यांसारख्या शहरांमध्येही ब्रिटीश आधीच अल्पसंख्यांक झाले आहेत.

वर्ष २०६३ पर्यंत ब्रिटीश वंशाचे लोक अल्पसंख्यांक असतील !

अहवालात म्हटले आहे की, वर्ष २०७५ पर्यंत ब्रिटीश मूळ असलेल्यांची लोकसंख्या ७३ ते ४४ टक्क्यांपर्यंत खाली येईल. वर्ष २१०० पर्यंत ते केवळ ३३.७ टक्के इतके रहातील. अश्‍वेत लोकांची लोकसंख्या सध्या १९.७ टक्के आहे, जी वर्ष २०५० पर्यंत ३४.८ टक्के असेल. वर्ष २०६३ पर्यंत ब्रिटीश वंशाचे लोक अल्पसंख्यांक असतील. परदेशात जन्मलेले आणि त्यांचे वंशज वर्ष २०७९ पर्यंत बहुसंख्य होतील.

प्रत्येक पाचवी व्यक्ती मुसलमान असेल

ब्रिटनमधील मुसलमानांची लोकसंख्या केवळ ७ टक्के आहे, जी पुढील २५ वर्षांत १२ टक्के असेल. या शतकाच्या अखेरीस, ब्रिटनमधील मुसलमानांची लोकसंख्या १९-२० टक्क्यांंपर्यंत पोचेल. म्हणजेच ब्रिटनमधील प्रत्येक पाचवी व्यक्ती मुसलमान असेल.

इस्लाम दुसरा सर्वांत मोठा धर्म

ख्रिस्ती धर्मानंतर इस्लाम ब्रिटनमधील दुसरा सर्वांत मोठा धर्म आहे. वर्ष २०२१ च्या जनगणनेनुसार ब्रिटनमधील मुसलमानांची लोकसंख्या ४० लाखांच्या पुढे गेली आहे. वर्ष २००१ मध्ये ती केवळ १६ लाख होती. लंडनमध्ये सर्वाधिक १५ टक्के मुसलमान आहेत.

ब्रिटनचे राजकारण पालटेल

केंट युनिव्हर्सिटीचे मानद प्राध्यापक मॅट गुडविन म्हणाले की, सरकारी जनगणनेच्या आकडेवारीवरील हा अहवाल डोळे उघडणारा आहे. सर्व स्थलांतरितांच्या हातून ब्रिटन त्याची मूळ ओळख, संस्कृती-पारंपरिकता गमावेल. यामुळे ब्रिटनचे राजकारण आणि परराष्ट्र धोरण हेही पालटेल.

झी न्यूज ५/६/२५

Powered By Sangraha 9.0