पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या मंदिराच्या ६ एकर भूमीवर अतिक्रमण

04 Jun 2025 14:30:00

 
sanskrutik vartapatra pakistan_15

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मंदिराची ६ एकर भूमी कह्यात घेण्याच्या विरोधात हिंदूंनी मोसेस खटियन जिल्ह्यातील तांडो जाम सिटी येथील प्रेसक्लबच्या बाहेर निदर्शने केली. यात महिला आणि मुले सहभागी झाली होती. ‘पाकिस्तान दलित इत्तेहाद’ या संघटनेच्या आवाहनावरून ही निदर्शने करण्यात आली. निदर्शकांनी सांगितले की, बांधकाम व्यावसायिकांनी शिवमंदिराकडे जाणारा रस्ताही बंद केला आहे.

१. हिंदूंचे नेते सिटल मेघवार या वेळी म्हणाले की, काही लोकांनी मोसेस खटियानमधील शिवमंदिराच्या भूमीवर बेकायदेशीर बांधकाम चालू केले आहे.

२. दुसरे नेते राम सुंदर म्हणाले की, मंदिर आमच्यासाठी पवित्र आहे आणि बांधकाम व्यावसायिकांनी मंदिराच्या सभोवतालच्या भूमीवर बांधकाम चालू केले आहे, ज्यात समुदायाच्या स्मशानभूमीचाही समावेश आहे.

३. पाकिस्तान दलित इत्तेहादचे प्रमुख शिव काची म्हणाले की, पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांना लेखी तक्रार दिल्यानंतरही कोणतीही कायदेशीर कारवाई केली गेली नाही.
जर सरकार आणि स्थानिक अधिकारी यांनी याकडे लक्ष न दिल्यास पुढच्या टप्प्यात हैदराबाद शहरात निदर्शने केली जातील आणि न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली जाईल.

१०० वर्षे जुने मंदिर

शिवमंदिर १०० वर्ष जुने आहे. मंदिराच्या सभोवतालच्या ४ एकर जागेचे व्यवस्थापन करण्यासाठी एक समिती आहे. मंदिराजवळ हिंदूंवर अंत्यसंस्कार केले जातात. मंदिरात वार्षिक धार्मिक समारंभ आयोजित केला जातो.

सनातन प्रभात ४/६/२५

Powered By Sangraha 9.0