माहीत असावं असं काही

28 Jun 2025 17:30:00
 
Sanskrutik Vartapatra_Anya_ 71 (1) 
उष्णकटिबंधीय जंगलातील प्राणी इतके रंगीबेरंगी असण्यामागचे कारण सांगताना जर्मनीतील Leibniz Centre for Tropical Marine Research येथे कार्यरत असलेले मत्स्य संशोधक ऑस्कर पुएब्ला सांगतात की ,'प्राणी सामान्यतः रंगांचा उपयोग संवादासाठी करतात. तो संवाद जोडीदारांना आकर्षित करण्यासाठी, शिकाऱ्यांना विषारी असल्याचा इशारा देण्यासाठी किंवा स्वतःला झाकण्यासाठी असतो. पक्षी आपल्या आहारातून रंगद्रव्ये घेतात, जसं की carotenoids जे त्यांना तेजस्वी लाल, केशरी आणि पिवळे रंग मिळवून देतात. हे रंग आकर्षण निर्माण करण्यासाठी किंवा वर्चस्व सिद्ध करण्यासाठी वापरले जातात.
तर मासे तसेच शंख-शिंपल्यासारखे जलचर प्राणी आपल्या पेशीतील सूक्ष्म संरचनेद्वारे प्रकाश वाकवतात वा विखुरतात,ज्यामुळे त्यांचा रंग बदलतो आणि ते शिकाऱ्यांपासून लपून राहू शकतात.
Powered By Sangraha 9.0