वारकर्‍यांच्या धर्मांतरासाठी ख्रिस्ती मिशनर्‍यांचे हस्तक कार्यरत

24 Jun 2025 14:30:00

sanskrutik vartapatra christianity_4 
श्री विठ्ठलाच्या नामाचा गजर करत पंढरपूरला विठुमाऊलीच्या दर्शनासाठी जात असलेल्या वारकर्‍यांचे धर्मांतर करण्यासाठी ख्रिस्ती मिशनर्‍यांचे काही हस्तक वारीत कार्यरत झाले आहेत. भोळ्याभाबड्या वारकर्‍यांना बायबलमधील लिखाणाची पत्रके देऊन त्यांना येशूची उपासना करण्याचे आवाहन ते करत असल्याचे उघड झाले आहे. २२ जून या दिवशी पुणे येथून पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करत असतांना येथील फातिमानगर येथे सकाळी एक महिला अशा प्रकारच्या पत्रकांचे दिंडीत वितरण करत होती. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या एका जागरूक धारकर्‍याच्या हे लक्षात आल्यावर त्याने दिंडीमध्ये ही पत्रके वितरण करणार्‍या महिलेला रोखले.
पत्रके वाटण्यासाठी ख्रिस्ती मिशनर्‍यांनी महिलांना पुढे केले आहे, तसेच आपण व्यसनमुक्तीची पत्रके वाटप करत आहोत, असे दाखवण्यासाठी व्यसनमुक्तीसाठी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. यासाठी त्यांवर संपर्क क्रमांकही देण्यात आले आहेत. या पत्रकांवर ‘देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. अशासाठी की, जो कुणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये’, असे बायबलमधील लिखाण संदर्भासह देण्यात आले आहे.
 
सनातन प्रभात २२/६/२५
Powered By Sangraha 9.0