सांस्कृतिक वार्तापत्राच्या 'वारीतील घुसखोरी' या विशेष अंकातून वारकऱ्यांमध्ये जागृतीचा 'जागर'

24 Jun 2025 14:42:13
 
Untitled design (2)
 
सांस्कृतिक वार्तापत्राच्या १ जुलै २०२५ च्या*वारीतही घुसखोरी* या अंकात प्रत्येक भक्तात माऊली पाहणाऱ्या भोळ्या वारकऱ्यांना वारीमध्ये घुसलेल्या चुकीच्या आणि दुष्ट प्रवृत्तीची जाणीव करून देण्याचे काम केले आहे.तसेच त्याला जागे करण्याचे काम केले आहे.
हा अंक वारीतील भाविकांना पोचवण्याचे काम प्रामुख्याने धर्मजागरण प.महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांनी केले. आजपर्यत मिळालेल्या माहितीच्या आधारे धर्मजागरणच्या कार्यकर्त्यांनी दिंडीतील सामान्य जन,दिंडी प्रमुख,कीर्तनकार,प्रवचनकार यांच्या हस्ते पुण्याच्या ७ भागात १४ ठिकाणी या अंकाचे प्रकाशन केले. वारीत अंक मोफत वाटपाचे काम विश्व हिंदू परिषद,धर्मजागरण,मोरया हॉस्पिटलच्या पाच व्हॅन,सांस्कृतिक वार्तापत्राचे प्रतिनिधी,देणगीदार व हितचिंतकांनी केले आहे सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Powered By Sangraha 9.0