वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये भारताचा दबदबा टॉप २०० मध्ये तीन शिक्षण संस्था

20 Jun 2025 17:30:00
Sanskrutik Vartapatra_Anya-63 (1)

 
 
 
प्रतिष्ठित क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटीची रँकिंग २०२६ ची यादी नुकतीच जाहीर झाली असून, जागतिक स्तरावर भारतीय शिक्षण संस्थांनी पुन्हा एकदा आपला दबदबा राखला आहे.
यावर्षी तब्बल ५४ भारतीय विद्यापीठांनी या जागतिक क्रमवारीत स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे यादीतील टॉप २०० मध्ये तीन भारतीय शिक्षण संस्थांनी स्थान मिळवले असून जागतिक पातळीवर १२३ व्या क्रमांकावर झेप घेत आयआयटी दिल्लीने देशात अव्वल स्थान पटकावले आहे. आयआयटी बॉम्बे आणि आयआयटी मद्रास या दोन संस्था टॉप २०० मध्ये आहेत.
क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ मध्ये भारतासाठी एकंदरीत संमिश्र चित्र समोर आले आहे. २०१४ मध्ये केवळ ११ युनिव्हर्सिटी या यादीत होती. त्या तुलनेत यंदा ५४ युनिव्हर्सिटीचा समावेश ही मोठी प्रगती दर्शवते.

पुढारी २०.६.२५.
Powered By Sangraha 9.0