श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जमा होणार्‍या निर्माल्यापासून उदबत्तीची निर्मिती !

17 Jun 2025 10:30:00
 
sanskrutik vartapatra anya_57.jpg
 
श्री विठ्ठल-रुक्मिणी आणि परिवार देवता या मंदिरात जमा होणार्‍या निर्माल्यापासून उदबत्ती सिद्ध करून भाविकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला होता. ही उदबत्ती भाविकांना १५ जूनपासून उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. यात निशिगंध, केशर, चंदन, सोनचाफा, समर्थ इत्यादी ४ प्रकारच्या उदबत्ती सिद्ध केल्या आहेत. त्याची प्रतिनग ५० रुपये किंमत आहे. श्रींना अर्पण केलेल्या हार-फुलांच्या निर्माल्याचे पावित्र्य जपण्याचा मंदिर समितीने प्रयत्न आहे, असेही व्यवस्थापक श्री. मनोज श्रोत्री यांनी सांगितले.

सनातन प्रभात १५/६/२५
Powered By Sangraha 9.0