इराणमध्ये 'रक्ताचा पाऊस' निसर्गाचा चमत्कार !

17 Jun 2025 17:30:00

Sanskrutik Vartapatra_Anya_61.jpg 
इराणच्या होरमुझ बेटावर नुकतेच एक आश्चर्य पाहायला मिळाले. येथील समुद्रकिनाऱ्यावर पावसाचे पाणी आणि वाळू एकत्र आल्यानंतर संपूर्ण परिसर रक्तासारखा लाल झाला. तज्ज्ञांच्या मते, हा बदल 'ब्लड रेन' नावाच्या एका दुर्मिळ नैसर्गिक प्रक्रियेमुळे झाला आहे. ही कोणतीही अलौकिक घटना किंवा नैसर्गिक आपत्ती नसून, निसर्गाचा एक अद्भुत देखावा आहे.
'ब्लड रेन' ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. वाऱ्यामुळे मातीतील लाल रंगाचे सूक्ष्म कण वातावरणात फेकले जातात आणि ढगांमध्ये मिसळून पावसासोबत खाली पडतात. ही घटना सर्वत्र घडत नाही; परंतु होरमुझसारख्या लोहयुक्त माती असलेल्या बेटांवर अशी दुर्मिळ घटना घडू शकते.

यावर वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की होरमुझ बेताची माती 'गेलक सॉईल' म्हणून ओळखली जाते, ज्यामध्ये लोह ऑक्साईडचे प्रमाण खूप जास्त आहे. नासाच्या अहवालानुसार हे बेट एक 'सॉल्ट डोम' आहे, जिथे मीठ,जिप्सम,सेल आणि लोहाने समृद्ध ज्वालामुखीजन्य खडक आढळतात. जेव्हा या बेटावर जोरदार पाऊस पडतो, तेव्हा डोंगरावरील लाल माती पावसाच्या पाण्यासोबत वाहून समुद्राच्या पाण्यात मिसळते. लोहाच्या उच्च प्रमाणामुळे समुद्राचे पाणी आणि किनारा गडद लाल रंगाचा दिसू लागतो आणि मग तो जणू रक्ताचाच पाऊस आहे की काय असे भासते!

पुढारी १६.६.२५.
Powered By Sangraha 9.0