कर्कवृत्ताला दोनदा ओलांडून वाहणारी भारतातील एकमेव नदी

16 Jun 2025 17:30:00
 
Sanskrutik Vartapatra_Anya_60.jpg
 
मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमधून वाहणारी आणि कर्कवृत्ताला दोनदा ओलांडणारी अशी एक नदी आहे, जिचे नाव आहे 'माही'.
मध्य प्रदेशात उगम पावणारी ही नदी नंतर राजस्थानमध्ये प्रवेश करते आणि नंतर गुजरातमध्ये अरबी समुद्राला मिळते. तिच्या या प्रवासात ती दोनदा कर्कवृत्त ओलांडते. कर्कवृत्त हे भारताच्या गुजरात राज्यातील कच्छ, पाटण, मेहसाणा, गांधीनगर, साबरकांठा आणि अरवली या सहा जिल्ह्यांमधून जाते. माही नदीचे हे भौगोलिक वैशिष्ट्य तिला भारताच्या इतर नद्यांपेक्षा वेगळे ठरवते.

पुढारी १६.६.२५.
Powered By Sangraha 9.0