ताम्हिणी'त शाश्वत पर्यटन प्रकल्प

10 Jun 2025 10:25:50
 
sanskrutik vartapatra paryavaran_7
 
पश्चिम घाटातील जैववैविध्याने समृद्ध ताम्हिणी अभयारण्यातील संवर्धन आणि शाश्वत पर्यटनाच्या उद्देशाने वन विभागातर्फे 'बायोडायव्हर्सिटी अँड इको-प्रोटेक्शन इन प्लस व्हॅली, ताम्हिणी' हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
 
त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी वन विभागाला 'मायक्रोसॉफ्ट' तर्फे आर्थिक साह्य करण्यात येणार असून, सीवायडीए संस्थेतर्फे अंमलबाजवणी आणि वन विभागाबरोबर समन्वयाची जबाबदारी सांभाळण्यात येणार आहे.
 
ताम्हिणी अभयारण्यातील प्रामुख्याने प्लस व्हॅली परिसरात पहिल्या टप्प्यात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या संदर्भात पुणे वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक कार्यालय आणि सेंटर फॉर यूथ डेव्हलपमेंट (सीवायडीए) यांच्यामध्ये गुरुवारी वन भवन येथे करार करण्यात आला. या वेळी उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, संस्थेचे कार्यकारी संचालक प्रवीण जाधव, 'इंडिया अँड कूल'चे श्रीचंदना नागोजीही यांसह वन विभागाचे अधिकारी, 'मायक्रोसॉफ्ट' आणि सीवायडीए संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 
लोकसहभागातून वन संरक्षण आणि संवर्धन या संकल्पनेनुसार ताम्हिणी अभयारण्यातील प्लस व्हॅली वनक्षेत्रात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तेथील जैववैविध्याचे संरक्षण हा मुख्य उद्देश आहे.
या प्रकल्पांतर्गत ताम्हिणी अभयारण्यात अनेक पर्यावरणस्नेही कामेही होणार आहेत, असे चव्हाण यांनी सांगितले.
 
महाराष्ट्र टाईम्स ९/६/२५
Powered By Sangraha 9.0