India Operation Sindoor Live Updates
भारतात तीव्र संताप व्यक्त केली जात होती. पाकिस्तानला धडा शिकवला जावा, अशी मागणी केली जात होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील भारताला समर्थन मिळत होतं. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय बैठका होत असताना लवकरच काहीतरी मोठं घडण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याचं उत्तर आता मिळालं असून भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तब्बल ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत.अजूनही ही परिस्थिती बदलत आहे. नव्या घडामोडी घडत आहेत. त्यामुळे आम्ही आत्ता प्रश्नोत्तरं घेऊ शकणार नाही. पण आम्ही लवकरच यासंदर्भात पुन्हा तुमच्यासमोर येऊन माहिती देऊ - भारतीय लष्कराची माहिती
कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली सविस्तर माहिती
सवाईनाला ते भागलपूरपर्यंत दहशतवादी तळ पसरलेले होते. गुप्तचर माहितीच्या आधारे हे लक्ष्य निश्चित करण्यात आले. त्यातून सामान्य नागरिकांना व निवासी भागांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली गेली.
सगळ्यात आधी सवाईनाला कॅम्प मुझफ्फराबाद हा तळ पाकव्याप्त काश्मीरमध्ये सीमेपासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. इथूनच काही हल्ल्यांमधील दहशतवाद्यांना प्रशिक्षण मिळालं होतं.
सय्यदना बिलाल कॅम्प मुझफ्फराबाद हा जैश ए मोहम्मदचा तळ आहे. इथे दहशतवादी हत्यारं आणि दारूगोळा ठेवत होते.
गुलपूर कॅम्प, कोटली हा एलओसीपासून ३० किलोमीटर दूर होता. लष्कर ए तय्यबाचा कॅम्प होता. राजौरी आणि पूंछमध्ये या कॅम्पमधून प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवाद्यांकडून कारवाया करण्यात आल्या होत्या.
बरनाला कॅम्प. भिमबर हा एलओसीपासून ९ किमी लांब आहे. इथे हत्यार, आयईडी यांचं प्रशिक्षण दहशतवाद्यांना दिलं जात होतं.
अब्बास कॅम्प, कोटली हा एलओसीपासून १३ किमी लांब आहे. लष्कर ए तय्यबाचा फिदायीन इथे तयार होत होता. १५ दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याची या कॅम्पची क्षमता होती.
पाकिस्तानच्या हद्दीतील टार्गेट
सर्जल कॅम्प. सियालकोट - हा आंतरराष्ट्रीय सीमेपासून ६ किमी अंतरावर आहे.
मेहमुला जाया कॅम्प, सियालकोट - हा १८ ते १२ कमी आंतरराष्ट्रीय सीमेपासून लांब होता. हा हिजबुल मुजाहिद्दीनचा कॅम्प होता. कठवा जम्मूमध्ये दहशत पसरवण्यासाठीचं केंद्र होतं. पठाणकोट एअर बेसवर झालेला हल्ला याच कॅम्पमध्ये आखण्यात आला होता.
मरकस ताएबा मुरीदके - हा आंतरराष्ट्रीय सीमेपासून १८ ते २५ किमी लांब आहे. २००८ च्या मुंबई हल्ल्याचे दहशतवादी इथेच प्रशिक्षित झाला होता. अजमल कसाब व डेविड हेडलीलाही इथेच प्रशिक्षण दिलं गेलं होतं.
मरकझ सुभानअल्लाह, भागलपूर हा तळ आंतरराष्ट्रीय सीमारेषेपासून १०० किमी लांब आहे. हे जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होतं. इथे रिक्रुटमेंट, प्रशिक्षण दिलं जात होतं. दहशतवाद्यांचे महत्त्वाचे नेते इथे येत होते.
लोकसत्ता ७/५/२५