ऑपरेशन सिंदूर’ चा सर्वात छोटा योद्धा

31 May 2025 10:30:00


sanskrutik vartapatra sanrakshan_5.jpg 

चंडीगड- ऑपरेशन सिंदूरच्या वेळी सीमेवर जवानांबरोबर १० वर्षांचा एक छोटा मुलगाही होता. पंजाबच्या फिरोजपुर जिल्ह्यातील तारावाली गावातील श्रवणसिंह हा तो मुलगा. उन्हाळा आणि शत्रू या दोघांशी लढणाऱ्या जवानांना तो दूष, लस्सी, थंड पाणी आणि बर्फ पोचवत होता. सैन्याने नुकतंच त्याला ‘ ऑपरेशन सिंदूर चा सर्वात छोटा नागरी योद्धा असं घोषित करून त्याचा सार्वजनिक सन्मान केला. श्रवणची मोठं होऊन सैन्यात जाण्याची इच्छा आहे.

दैनिक भास्कर २९.५.२५

Powered By Sangraha 9.0