उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेले धर्मांतर

30 May 2025 17:30:00

Sanskrutik Vartapatra_khrischyanti_8 
उत्तर प्रदेशातील भारत-नेपाळ सीमेजवळील पिलीभीत जिल्ह्यातील शीख बहुल गावांमध्ये शिखांचे मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन धर्मात रूपांतर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अखिल भारतीय शीख पंजाबी कल्याण परिषदेने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या काही वर्षात ३००० हून अधिक शीख लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. पिलीभीतमधील हजारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या गावांमध्ये २०,००० ते ३०,००० शीख लोक राहतात. या लोकांचे धर्मांतर करण्याचा मोठा प्रयत्न २०२० पासून सुरू आहे असे दिसून आले आहे. नेपाळमधून आलेले प्रोटेस्टंट पाद्री तसेच स्थानिक पाद्रीना यासाठी नियुक्त केले गेले आहे.
आर्थिक आमिष दाखवून तसेच आजार बरे करू अशी कारणे सांगून हे लोकं येथील शीख लोकांचे धर्मांतर करतात. धर्मांतर झालेल्या लोकांच्या घरावर क्रॉसचे चिन्ह लावले. जाते.
असेही लक्षात आले आहे की त्यांनी जे आमिष दाखवले ते नंतर पूर्ण केलेले दिसत नाही.
 
 
ऑर्गनायझर २२.५.२५. 
 
. 
Powered By Sangraha 9.0