पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात निर्माल्यापासून तयार होणार धूप व उदबत्ती

27 May 2025 10:30:00

 
sanskrutik varatapatra hindu sanskruti_26

 
पंढरपूर- श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात रोज हजारो भाविक दर्शनाला येतात. मुख्य मंदिर व परिवार देवता मंदिरात रोज मोठ्या प्रमाणात तुळशी- हार-फुले अर्पण केली जातात. त्यापासून जे निर्माल्य तयार होते त्याचे काय करायचे हा मोठा प्रश्न असतो. आता त्यापासून धूप व उदबत्ती तयार करण्यात येणार आहे. मंदिर समितीतर्फे हा निर्णय घेण्यात आला.

भाविकांना यावर्षीच्या आषाढी यात्रेपूर्वी ही उत्पादने उपलब्ध होतील. एकूण तीन ते चार प्रकारच्या उदबत्त्या तयार करण्यात येतील. याबाबतीत एका खाजगी कंपनीशी करार करण्यात आला आहे. मंदिरात दररोज सुमारे एक ते दीड टन निर्माल्य तयार होते.

पुढारी २३.५.२५

Powered By Sangraha 9.0