तेलाचा आणि पेट्रोल पॉलिटिक्सचा जन्म

26 May 2025 17:30:00
 
Sanskrutik Vartapatra_Anya_48 (2)
 
आजच्या दिवशी म्हणजेच २६ मे रोजी, १९०८ साली इराणच्या मशीद-ए-सुलेमान येथे पश्चिम आशियात प्रथमच पेट्रोलियमचा शोध लागला. अँग्लो-पर्शियन ऑईल कंपनी (आताची ब्रिटिश पेट्रोलियम) या ब्रिटिश कंपनीने भूगर्भशास्त्रज्ञ जॉर्ज रेनॉल्ड्स यांच्या नेतृत्वाखाली हा शोध लावला.
तब्बल सात वर्षाच्या अपयशानंतर २६ मे रोजी पेट्रोलचा पहिला फवारा २५ मीटर उंचीपर्यंत उडाला. सुरुवातीला खोदकाम अयशस्वी ठरले आणि रेनॉल्ड्स यांना काढूनही टाकण्यात आले होते. मात्र ब्रिटिश नौदलाला इंधन मिळाल्याने ब्रिटनने सागरी शक्तीमध्ये आघाडी मिळवली. आधी केवळ वाळवंट आणि भटकी संस्कृती ही ओळख असलेला मध्य पूर्वेचा प्रदेश आता जगाचे उर्जा केंद्र बनला आहे.
म.टा. २६.५.२५
Powered By Sangraha 9.0