माहीत असावं असं काही

22 May 2025 17:30:00

Sanskrutik Vartapatra_ Anya_48 
जगाने आज पहिल्यांदा बघितली होती सायकल
आजच्या दिवशी, म्हणजे २१ मे १८१९ साली न्यूयॉर्कच्या रस्त्यावर पहिल्यांदा सायकलसदृश 'स्विफ्ट वॉकर' दाखल झाली होती. याचा शोध १८१७ मध्ये जर्मन शास्त्रज्ञ कॅरल वॉन ट्रेस यांनी लावला आणि त्याला नाव दिले 'ड्रॅसिन'. ड्रॅसिन दोन चाकं असलेले लाकडाचे यंत्र होते. यात पेडल नव्हते. पायाने धक्का देऊन हे चालवले जायचे. अमेरिकेत हे वाहन मनोरंजन म्हणून सादर करण्यात आले होते. यानंतर १८६० च्या दशकात पेडल असलेली सायकल आली. त्यानंतर त्याचे व्यावसायिक मॉडेल सादर करण्यात आले.
म.टा.२१.५.२५.
Powered By Sangraha 9.0