तरंगती सौर फोटोव्होल्टिक उर्जा प्रणाली

21 May 2025 17:30:00
 
Sasnkrutik Vartapatra_Vidyan_2 (1)
 
आज जगभरात अपारंपरिक उर्जा स्त्रोतांचा वापर करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. यामध्ये सौर उर्जा, पवन उर्जा, जैविक उर्जा, जिओथर्मल उर्जा यांचा समावेश होतो. यातील सौर उर्जा सगळीकडे मोफत आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सौर उर्जेचा वापर फोटोव्होल्टिक पद्धतीने करून तयार करणे हा एक प्रभावशाली, पर्यावरण स्नेही तसेच सोयीस्कर मार्ग आहे. सौर उर्जा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात जागेची आवश्यकता असते. यावर उपाय म्हणून जगभरामध्ये जलसाठे,तलावांतील पाण्याच्या पृष्ठभागाचा वापर फोटोव्होल्टिक उर्जा तयार करण्यासाठी केला जात आहे. सर्वसाधारणपणे या उर्जा निर्मितीची कार्यक्षमता १५% मानली जाते.
 
सौर फोटोव्होल्टिक उर्जेचे फायदे
१.कार्यक्षमता वाढते.
२.पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यास मदत करते.
३.पाण्यावरील एकपेशीय वनस्पतीची वध रोखली जाते.
४.प्रणालीवर धूळ साचण्याचा धोका कमी होतो .
५.जमिनीचा वापर टाळता येतो. ही जागा शेती किंवा इतर कामांसाठी वापरली जाऊ शकते.
याचे काही तोटे आहेत पण होणाऱ्या फायद्यांचा विचार केल्यास आणि वाढत्या तापमानाचा विचार केला तर ही उर्जाप्रणाली अधिक फायदेशीर आहे हे नक्की. आपल्या देशात तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धरणांवर तरंगते सौर उर्जा प्रकल्प उभारले जात आहेत.
 
सकाळ,ॲग्रोवन २१.५.२५
Powered By Sangraha 9.0