वाचन संस्कृती वाढण्यासाठी प्रियंका चौधरींकडून पाच हजार पुस्तके

17 May 2025 14:30:00

sanskrutik vartapatra anya_46
 
वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी आणि ज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने, लायब्ररी गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियंका चौधरी यांनी पाच हजार पुस्तकांचे मोफत वाटप पुणे शहर आणि उपनगरात केले. या उपक्रमाअंतर्गत विविध प्रकारची पुस्तके-कथा, विज्ञान, आत्मविकास, शालेय अभ्यासक्रम आणि बालसाहित्य वाचकांच्या हातात मोफत पोहोचवण्यात आली.
यामध्ये प्रामुख्याने स्थानिक, सामाजिक संस्था, शाळा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात आले, जेणेकरून ज्ञानाची समान संधी सर्वांना मिळावी, हाच मूळ उद्देश होता. नागरिक, विद्यार्थी, शिक्षक आणि वाचनप्रेमी यांचा यात सहभाग मोठ्या प्रमाणांत होता. प्रियंका चौधरी म्हणाल्या, "वाढदिवस साजरा करताना तो समाजासाठी उपयुक्त ठरावा, हीच माझी भावना आहे. प्रत्येकाच्या हातात पुस्तक पोहोचवणे हे माझे ध्येय आहे.
सध्या काळात वाचन संस्कृती लोप पावताना आपणाला दिसत आहे. त्या वाचनसंस्कृतीला नवसंजीवनी देण्यासाठी माझ्यातर्फे हा मी खारीचा वाटा उचलला आहे," असे लायब्ररी गर्ल प्रियंका चौधरी म्हणल्या. भविष्यकाळात हजारांचा आकडा हा लाखात नेण्याचा त्यांचा मानस आहे.
 
मुंबई तरुण भारत १०/५/२५

Powered By Sangraha 9.0