'प्लॅस्टिकमुक्त' उपक्रमास वडगाव शेरीत सुरुवात

07 Apr 2025 11:15:36

sanskrutik vartapatraplastic-free-campaign-vadgaon-sheri-jpg 
वडगाव शेरी: नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाने प्लॅस्टिक बॅगचा वापर नागरिकांनी कमी करावा, असे आवाहन केले आहे. तसेच, नागरिकांकडून जुने कपडे घेऊन त्यांना कापडी पिशव्या शिवून देण्यात येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिक कापडी पिशव्या वापरतील. प्लॅस्टिक वापरणे कमी होणार आहे. यासाठी नगर रोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय प्लॅस्टिक पिशवीमुक्त अभियान राबवीत असल्याची माहिती नगर रोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त संजय पोळ यांनी दिली.
 
गेल्या काही वर्षांपासून प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्लॅस्टिकच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण आणि कचरा होत आहे. यामुळे पालिकेकडून प्लॅस्टिक वापरू नका, असे वारंवार आवाहन केले जात आहे. तरी,नागरिक प्लॅस्टिक वापरत आहेत. दुकानामध्ये साहित्य आणण्यासाठी प्लॅस्टिक बॅगचा मोठ्या प्रमाणात वापर होती. कापडी पिशव्यांची किंमत जास्त असल्याने अनेकदा नागरिक कापडी पिशव्या वापरत नाहीत, ही समस्या सोडविण्यासाठी नगर रोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाने प्लॅस्टिकमुक्त अभियान राबविण्याचा निर्णय घेतला नागरिकांनी आपले नको असलेले शर्ट,पँट, साडी इ.कपडे नगर रोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय अथवा संबंधित विभागाचे अभियंता, आरोग्य निरीक्षक किंवा आरोग्य कोठी येथे जमा करावे. क्षेत्रीय कार्यालयाकडून नागरिकांना त्याच्या कापडी पिशव्या शिवून मिळतील. यामुळे नागरिक जास्त कापडी पिशवीचा वापर करतील.
 
पुढारी ३.४.२५
Powered By Sangraha 9.0