जम्मू: पाकिस्तानी सैन्याने जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) एक सुरुंग स्फोट घडवून आणल्यानंतर विनाकारण गोळीबार करीत युद्धबंदीचे उल्लंघन केले, असे संरक्षण प्रवक्त्याने सांगितले.
भारताने कृष्णा घाटी सेक्टर येथे झालेल्या या युद्धबंदीच्या उल्लंघनाला चोख प्रत्युत्तर दिले व नियंत्रण रेषेवर आपला दबदबा कायम ठेवला. सध्या तेथील स्थिती नियंत्रणात आहे. मंगळवारी दुपारी १:१० वाजता पाकने युद्धबंदीचे उल्लंघन केले. स्फोट व त्यानंतर दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात पाकचे पाच सैनिक जखमी झाले.
सीमापार होणारा गोळीबार व आयईडी हल्ल्याच्या अनेक घटनांनंतर तणाव कमी करण्यासाठी भारत व पाक सैन्याने २१ फेब्रुवारी रोजी एक फ्लॅग मीटिंग घेतली होती. यात दोन बाजूंनी सीमेवर शांतता कायम राखण्यावर भर दिला होता.
लोकमत ३.४.२५