हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्यतृतीया येते. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी 'कृतयुग' संपून 'त्रेतायुग' सुरू झाले असे मानले जाते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ हे कधीही न संपणारे म्हणजेच 'अक्षय्य' असते. तसेच हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो.
याखेरीज याचं दिवशी बद्रीनाथाच्या मंदिराचे दरवाजे उघडतात आणि ते दिवाळीतील भाऊबीजेच्या दिवशी बंद होतात.वृंदावनातील बाकेबिहारीच्या मंदिरात याच दिवशी श्रीविग्र्हाचे दर्शन होते.
नर -नारायण तसेच परशुराम यांचे अवतरण याचं दिवशी झाले असे मानले जाते.
अक्षय्यतृतीयेच्या दिवशी खरेदी करण्याला महत्व आहे तसेच पाणी, तांदूळ,मीठ,साखर,तूप अशा गोष्टी दान देण्यालादेखील महत्व आहे.
संदर्भ : विकिपीडिया