पहलगाम येथील भीषण आतंकवादी आक्रमणानंतर जम्मू-काश्मीरमधील आतंकवादाचे भीषण वास्तव पुन्हा समोर आले आहे. येथील स्थानिक मुसलमानच आतंकवाद्यांना त्यांच्या घरांमध्ये आश्रय देतात, यावर देशभर चर्चा होत आहे.
एका वृत्तवाहिनीने काश्मीरच्या घरांमध्ये जाऊन प्रत्यक्ष केलेल्या पाहणीच्या वेळी या घरांमध्ये आतंकवाद्यांसाठी कशा प्रकारे जागा निर्माण केल्या जात आहेत, हे समोर येते. काश्मीरमध्ये घरांच्या बाहेरील मॅनहोल, अगदी चुलीवरच्या चिमनी, लाकडी पायर्या, घराचे छत अशा अनेक ठिकाणी आतंकवाद्यांना लपण्याच्या जागा निर्माण केलेल्या या व्हिडिओतून समोर आले आहे. याला तेथील सैन्यदलाच्या अधिकार्यांनीही दुजोरा दिला आहे. या जागांचा उपयोग लपण्यासाठी किंवा रिमोट कंट्रोलद्वारे बाँबस्फोट करण्यासाठी केला जातो, असे त्यांनी सांगितले.
सनातन प्रभात २७/४/२५