पहलगाम हल्ल्यानंतर, भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याची दिलेली मुदत २७ एप्रिल रोजी संपली आहे. आता त्याचे पुढचे पाऊल म्हणून केंद्र सरकार पाकिस्तानी नागरिकांना कायदेशीररित्या देशातून बाहेर काढणार आहे. या आदेशानंतर अटारी सीमेवर पाकिस्तानी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. हे लोक आपल्या देशात जाण्यासाठी सीमेवर पोहोचले आहेत पण पाकिस्तान सीमा बंद केल्याचे कारण सांगून त्यांना परत घेण्यास नकार देत आहे. आता भारताने ठरवले आहे की पाकिस्तानने कायदेशीर मार्गाने आपल्या नागरिकांना परत न घेतल्यास नो मॅन्स लँडमध्ये सोडण्याची कारवाई केली जाईल. त्यानंतर जबाबदारी पाकिस्तानची असेल.
पाकिस्तानची जबाबदारी, पाठवण्याचे अनेक मार्ग :
एका अधिकाऱ्याने सांगितले की, आपल्या नागरिकांना परत घेण्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे. व्हिसावर कायदेशीररीत्या भारतात आलेल्या नागरिकांना परत न घेतल्यास भारतीय सीमा ओलांडताना तेथील सर्व नागरिकांना नो मॅन्स लँडवर सोडले जाईल. याशिवाय हवाई मार्गाने आलेले पाकिस्तानी नागरिक ज्या देशातून भारतात आले होते, त्या देशातून त्यांना परत पाठवले जाईल. जे नागरिक भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करताना आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण भारतात सुमारे ६०० पाकिस्तानी नागरिक आहेत, सर्व राज्यांनी पाकिस्तानी नागरिकांबाबत त्यांचे अहवाल पाठवण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानातून सुमारे ६०० लोक वेगळ्या व्हिसावर दक्षिण भारतात आले होते.
गेल्या काही दिवसांत सुमारे २७२ पाकिस्तानी नागरिक भारत सोडून अटारी-वाठा सीमा चौकीतून पाकिस्तानात गेले आहेत. पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरून गेल्या दोन दिवसांत 13 राजनैतिक अधिकारी आणि अधिकाऱ्यांसह एकूण ६२९ भारतीय नागरिक पाकिस्तानातून भारतात परतले आहेत.
२५ एप्रिलला १९१, तर २६ एप्रिलला ३ पाकिस्तानी नागरिक अटारी-वाघा सीमेवरून मायदेशी गेले. २५ एप्रिल रोजी अटारी-वाधा सीमेवरून २८७ भारतीय नागरिक पाकिस्तानातून भारतात आले.
नवभारत २८/४/२५