छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी २२ नक्षलवाद्यांना अटक केली आहे. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या नक्षलविरोधी अभियानाचा एक भाग म्हणून उसूर पोलिस ठाण्यातून जिल्हा दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कोब्रा बटालियन गस्तीवर पाठवण्यात आल्या होत्या. कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी टेकमेटला गावाच्या जंगलातून ७ नक्षलवाद्यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांकडून टिफिन बॉम्ब, कार्डेक्स वायर, इलेक्ट्रिकल वायर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. जंगला पोलिस ठाण्याकडून बेलचर, भुर्रीपाणी आणि कोटमेटा गावाकडे संयुक्त पथक गस्तीवर पाठवण्यात आले. बेलचर गावच्या जंगलातून सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना अटक केली. दुसऱ्या एका कारवाईत सुरक्षा दलांनी कंदाकारका जंगलातून ९ नक्षलवाद्यांना अटक केली. परिसरात नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे.
नवभारत १८/४/२५