वसई: देशात धर्मांतरांच्या घटना आणि त्यावरून होणारा हिंसाचार याच्या बातम्या वाढत असताना वसई येथे मात्र ५०६ धर्मांतरित कुटुंबांनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला आहे.
पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी लोकांमध्ये पायाभूत सुविधा आणि बदलत्या जीवनशैलीचा अभाव दिसून येतो. त्यामुळे त्यांना आमिषे दाखवून, त्यांच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन आणि हिंदू धर्माबाबत अपप्रचार करून त्यांचे धर्मांतरण केले जाते. अशा धर्मांतरित लोकांना याचा नंतर पश्चात्ताप होतो. त्यामुळे अशा कुटुंबांना विधिवत पुन्हा हिंदू धर्मात घेण्याचे महाअभियान दि.१८ एप्रिल रोजी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले.
मुं.त.भा २१.४.२५.