१ कोटींच्या इनामी नक्षलवादीसाठी ११ भूमिगत बंकर

19 Apr 2025 16:00:00

sanskrutik-vartapatra-naxalvad_naxal-misit-besra-bunkers-saranda-forest-ied-defused.jpg
रांची : कुख्यात नक्षलवादी मिसित बेस्रा बोरे याला लपण्यासाठी बनवलेली ११ भूमिगत बंकर सुरक्षा दलांनी मंगळवारी ती छत्तीसगडच्या सरांडा जंगलात है. उद्ध्वस्त केली. बेस्रावर १ कोटी ने रुपयांचे बक्षीस आहे. यासोबतच सात नी शक्तिशाली इम्प्रोवाईज्ड एक्सप्लोसिव डिव्हाईस (आयईडी) निष्क्रिय केले.

पोलिसांच्या मते, हे बंकर बेस्स्रा आणि त्याच्या गटासाठी तयार केले गेले होते. बेस्रा आणि त्याच्या गटासाठी - राहण्याची योग्य व्यवस्था केली गेली होती, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
बंकरांचे आकार २५ बाय ३५ फूट, २० बाय २५ फूट आणि १५ बाय २० फूट होते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात हल्ल्याच्या नियोजनाचे संकेत मिळतात. याशिवाय, ठिकाणावर सहा माओवादी गोपनीय स्थळे सापडली. त्यामध्ये एक प्रिंटर, दोन बॅटऱ्या, काडतुसे, एक लेथ मशिन, १८ पाईप, १५ मीटर वायर आणि इतर काही रोजच्या वापरातील वस्तू आढळली. लुईया आणि बकराबेरा जंगलांमध्ये पोलिस ठाणे टोण्टो अंतर्गत सुरक्षा दलांनी व्यापक शोधमोहीम चालवली. सुरक्षा दलांनी सात आयईडी जप्त केले. पाच आईडी सोमवारी सापडले आणि उर्वरित दोन मंगळवारी सापडले.

एका आईडीचे वजन १५ कि. ग्रॅ., दुसऱ्या दोन आईडीचे १०, दोन आईडीचे ५ तर दोन ४ किलोचे होते. होता. त्यांना ताबडतोब बॉम्बनाशक पथकाने निष्क्रिय केले, असे पोलीस मुख्यालयाच्या पत्रकात म्हटले आहे.

पुढारी १७.४.२५  
Powered By Sangraha 9.0