मासेमारीवर पावसाळ्यात बंदी: शासनाचा निर्णय आणि हिंदू संस्कृतीतील शास्त्र

15 Apr 2025 10:30:00

sanskrutik-vartapatra-hindu-sanskruti_1fishing-ban-maharashtra-ashadhi-to-narali
छ. संभाजीनगर -मासेमारीवर पावसाळ्यात ९०दिवस बंदी घालण्याचा प्रस्ताव शासनाकडून देण्यात आला आहे. कारण या काळात माशांचे प्रजनन होते आणि त्यामुळे त्यांचे संवर्धन आवश्यक असते.
राज्यात ५८ प्रमुख जलाशयांमध्ये (उदा. उजनी, जायकवाडी, गंगापूर, कोयना, निंबोळ, वाडवण, गोदावरी, मुळा, पेंच, बाणगंगा, इ.) मासेमारी होते. त्यामुळे मासे पकडण्यावर बंदी टाकून प्रजननास पूरक वातावरण मिळवणे हे या निर्णयामागचे कारण आहे.
पण हे आपले पूर्वज शेकडो वर्षांपूर्वीपासून जाणून होते!
हिंदू धर्मात आषाढी एकादशी ते नारळी पौर्णिमा या काळात मासे खाणे आणि पकडणे वर्ज्य मानले गेले आहे.
यामुळे माशांच्या प्रजननाला संधी मिळते आणि नैसर्गिक संतुलन राखले जाते.
आजही आपण या पारंपरिक ज्ञानाची पुनःप्राप्ती करत आहोत – हेच आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य!
हिंदू धर्माच्या प्रथा म्हणजे अंधश्रद्धा नाहीत, तर त्या विज्ञाननिष्ठ व निसर्गसंवेदनशील जीवनशैलीचा भाग आहेत.

पुण्यनगरी १०.४.२५ 
Powered By Sangraha 9.0