हनुमान जयंती: चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सकाळी म्हणजेच सूर्योदयाच्या वेळी माता अंजनीच्या पोटी हनुमंताचा जन्म झाला. तो वायू पुत्र आहे. हा दिवस सर्वत्र हनुमान जयंती म्हणून साजरा केला जातो. हनुमंत हा प्रभू श्रीरामाचा सर्वोत्तम शिष्य आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादाने त्याला चिरंजीवित्व प्राप्त झाले आहे. 'चिरंजीव होशील' हा आशीर्वाद स्विकारताना हनुमंताने श्रीरामाला एक अट घातली की जोवर तुमचे नाव या पृथ्वी लोकावर घेतले जाईल तोवरच मी इथे राहीन. यावर प्रभू श्रीरामाने त्याला 'तथास्तु' असा वर दिला.
हनुमंत हा शौर्याचे, पराक्रमाचे आणि शक्तीचे प्रतीक आहे.
हनुमंताची पूजा करताना त्याला तेल, रुईची माळ आणि शेंदूर या तीन गोष्टी अर्पण केल्या जातात.
आज आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम, मंडपम येथे १७६ फुटी हनुमानाची मूर्ती तयार केली आहे जी भारतातील सर्वात उंच मूर्ती आहे. ही मूर्ती बनविण्यासाठी तब्बल १५ वर्षे लागली.
संदर्भ : सकाळ आणि इंटरनेट