पुणे जिल्ह्यातील विविध बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना आता आंतरराष्ट्रीय पातळीवर भाव येणार आहे. पुणे लोहगाव विमानतळावर येणाऱ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रवाशांसह पर्यटकांना जिल्ह्यातील खाद्यपदार्थांची चव चाखता येणार आहे. धान्य, विविध प्रकारच्या उत्पादनांची खरेदी करता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उत्पादने आता देशभर आणि देशाबाहेरही पोहोचू शकणार आहेत.
लोहगाव विमानतळावर बचतगटांच्या उत्पादनांसाठी खास दालन उपलब्ध करण्यात आले आहे. या दालनाचे लवकरच उद्घाटन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
विमानतळावर जागा उपलब्ध करून देण्यासाठी विमानतळ प्राधिकरण; तसेच विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सहकार्य केले आहे. बचतगटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ, विविध प्रकारच्या वस्तू, सेंद्रिय उत्पादनांसह ग्राहकोपयोगी वस्तूंचा समावेश आहे. या दालनास सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जिल्ह्यातील सुमारे २० ते २५ बचतगटांच्या वस्तू विक्रीला ठेवण्यात आल्या आहेत. त्या वस्तूंना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महाराष्ट्र टाईम्स ९.४.२५