दहशतवादाचा समूळ बीमोड करा, घुसखोरी थांबवा – अमित शहा यांचा स्पष्ट संदेश

11 Apr 2025 12:30:00

sanskrutik_vartapatra_amit-shah-jammu-kashmir-security-review 
श्रीनगर- 'दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यावर भर द्या आणि सीमेपलीकडून होणारी घुसखोरी पूर्ण थांबवा,' अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांना केली. येथील राजभवनात संयुक्त उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते.
 
जम्मू काश्मीरमधील विविध विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी सुरक्षा स्थितीबाबत आढावा बैठक घेतली. सर्व सुरक्षा यंत्रणांचे संयुक्त मुख्यालय राजभवनात आहे. 'सर्व सुरक्षा यंत्रणांनी समन्वयाने काम करावे आणि सीमेपलीकडून होणारी घुसखोरी पूर्णपणे थांबवावी त्याचबरोबर दहशतवादाविरोधात 'झिरो टॉलरन्स' धोरण अंगीकारावे ',असेही शहा यांनी सांगितले.
 
डोंगराळ भागात टेहळणी काटेकोर भदेरवाह- हिमशिखरांवरील बर्फ सध्या वितळण्यास सुरुवात झाली असून, डोंगरातील पायवाटा खुल्या होऊ लागल्याने लष्कराने डोडा जिल्ह्याच्या डोंगराळ आणि वन्य भागांतील टेहळणी अधिक काटेकोर केली आहे. चिनाब नदी ओलांडून होणाऱ्या घुसखोरीला त्यातून आळा घालणे शक्य होणार आहे. भदेरवाह भागातील डोंगराळ भागात गस्त वाढविण्यात आली आहे.
 
सकाळ ९.४.२५
Powered By Sangraha 9.0