छत्तीसगडमधील (CHATTISGARH) सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दोन नक्षलवाद्यांना (NAXAL) अटक केली आहे. नक्षलवाद्यांना रेशनचा पुरवठा करणारा मुचकी सुरेश आणि दुसरा नक्षलवादी पुनेम हिडमा यांना जगरगुंडा पोलिस स्टेशन हद्दीतील कुंदर गावच्या जंगलातून पकडण्यात आले. नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच, जिल्हा दल आणि सीआरपीएफचे (CRPF) संयुक्त पथक जगरगुंडा पोलिस स्टेशनमधून कुंदेड गावाच्या दिशेने रवाना करण्यात आले.
सुरक्षा दलांनी नाकाबंदी करून दोन्ही नक्षलवाद्यांना अटक केली. दोन्ही नक्षलवाद्यांचा सुरक्षा दलांच्या हालचालींचा वेध घेणे, सैनिकांनी वापरलेल्या मार्गांवर भूसुरुंग आणि लोखंडी खिळे लावणे आणि रस्ते खोदणे यातही सहभाग होता.
नवभारत १६/०३/२५