वर्षअखेरीस रोबोट 'व्योमित्र' अंतराळात जाणार

21 Mar 2025 10:30:00

Anya21.03.2025
 
 
नवी दिल्ली: गगनयान अंतराळात पाठवण्याची भारताची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. गगनयानच्या शेवटच्या प्रशिक्षण उड्डाणाचा भाग म्हणून या वर्षाच्या अखेरीस महिला रोबोट 'व्योमित्र' अंतराळात पाठवले जाणार असल्याची माहिती बुधवारी केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी बुधवारी लोकसभेत दिली.
भारताचे पहिले मानवी अंतराळ उड्डाण अभियान 'गगनयान' साठी निवड केलेल्या चार अंतराळवीरांना प्रशासनाकडून सार्वजनिक जीवनापासून दूर ठेवण्यात आले आहे. अंतराळ मोहिमेसाठी या चौघांचाही प्रशिक्षण कार्यक्रम सुरु आहे. त्यांचे लक्ष विचलित होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून अशी उपाययोजना केल्याचे जितेंद्र सिंग यांनी स्पष्ट केले.
सिंग म्हणाले की, प्रश्नोत्तराच्या तासातील पहिला प्रश्न अंतराळाशी संबंधित आहे. योगायोग म्हणजे पहाटेच अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर दाखल झाल्या आहेत. शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या पूरक प्रश्नाचे उत्तर देताना सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनीता विल्यम्सला लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला.
लोकमत २०/०३/२५
Powered By Sangraha 9.0