इंफाळ : मणिपूरच्या चुराचांदमध्ये सोमवारी दोन वांशिक गटांमध्ये झालेल्या संघर्षानंतर उफाळलेल्या कुकी-झो-बहुल जिल्ह्यात नव्याने हिंसाचार उसळल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा एका ५३ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली.
मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यात 'झोमी' आणि 'हमार' जमार्तीच्या लोकांमध्ये झालेल्या ताज्या संघर्षात अनेक लोक जखमी झाले आहेत. येथील दोन्ही समुदायांच्या प्रमुख संघटनांमध्ये शांतता करार झाला असताना मंगळवारी रात्री उशिरा चुराचंदपूर शहरात पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला.
शहरातील काही लोकांच्या गटाने 'झोमी' या अतिरेकी गटाचा ध्वज काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा नवीन संघर्ष सुरू झाला. जमावाने परिसरात तोडफोड केली आणि काही लोकांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यावर गोळीबारही केला.
लोकमत २०/०३/२५