भारताकडे आता हवाई ‘अस्त्र’

20 Mar 2025 10:30:00


Antargat Suraksha19.03.2025

 
 
   भुवनेश्वर : भारताने स्वदेशी शस्त्र प्रणाली विकसित करण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल टाकत, 'अस्त्र' य बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर-टू-एअर मिसाईलचे यशस्वी चाचणी प्रक्षेपण केले आहे. ही चाचणी ओडिशाच्या किनारपट्टीवर 'एलसीए तेजस ए एफ एमके 1' प्रोटोटाईप लढाऊ विमानावरून करण्यात आली.संरक्षण दलातील सूत्रांच्या मते, एरॉनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीने चांदीपूर किनाऱ्यावरून हे चाचणी प्रक्षेपण पूर्ण केले. चाचणीमध्ये क्षेपणास्त्राने एका हलत्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला. या चाचणीमध्ये 'अस्त्र'च्या सर्व उपप्रणालींनी अचूक कार्य केले आणि मिशनची सर्व उद्दिष्टे पूर्ण झाली.
 

   संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 'डीआरडीओ', भारतीय वायुदल, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि या चाचणीमध्ये सहभागी असलेल्या सर्वाना शुभेच्छा दिल्या आहेत. ही चाचणी यशस्वी झाल्याने 'एलसीए तेजस ए एफ एमके 1' मध्ये 'अस्त्र' मिसाईल समाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील काही महिन्यांत अधिक चाचण्या घेण्यात येणार आहेत.

 
 

पुढारी १५.३.२५

Powered By Sangraha 9.0