पंतप्रधान सूर्यघर योजनेने पार केला ऐतिहासिक टप्पा

19 Mar 2025 10:33:10

Anya19.03.2025
 
 
नवी दिल्ली : देशातील पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना (पीएमएसजीएमबीवाय) ही जगातील सर्वांत मोठी सौरऊर्जा योजना ठरली आहे. या योजनेने १० मार्च रोजी एक ऐतिहासिक टप्पा पार केला. देशभरातील १० लाख घरांमध्ये मोफत सौरऊर्जा पोचवून ती घरे उजळवून टाकल्याची माहिती ऊर्जा मंत्रालयाने दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ फेब्रुवारी २०२४ रोजी ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत ४७.३ लाख अर्ज प्राप्त झाले. ६.१३ लाख लाभार्थ्यांना ४,७७० कोर्टीचे अनुदान दिले आहे.
 
सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी राज्ये
बांधलेली घरे (प्रमाण %)
गुजरात ४१.४७%
उत्तर प्रदेश ८.६९%
केरळ ७.७३%
बांधलेली घरे (संख्या )
गुजरात ३,५१,२७३
उत्तर प्रदेश ७३,६०२
केरळ ६५,४२३
 
सरकारी इमारतींवरही संच
चंडीगड, दमण आणि दीव यांनी १०० शासकीय इमारतीच्या छतावर सौरउर्जा संच बसवण्यात आले आहेत.राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडू यांनीही मोठ्या प्रमाणावर हे संच बसवले आहेत.
 
सरकारने २०२६-२७ पर्यंत १ कोटी घरांपर्यंत या योजनेतून ऊर्जा पोहोचवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.
 
कर्जासाठी ३.१ लाख अर्ज
लाभधारकाला सुलभ पद्धतीने वित्तपुरवठा केला जातो. २ लाखांपर्यंत कर्जावर ६.७५% अनुदानित व्याजदर दिला जातो. १२ सार्वजनिक बँकांद्वारे हे कर्ज पुरवले जाते. या कर्जासाठी आतापर्यंत ३.१० लाख अर्ज आले आहेत.
 
 
लोकमत १८.३.२५
Powered By Sangraha 9.0